मनपा हद्दीतील झोपडपट्यांना पावसाळयात तोडू नये; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन

निवडणुकांपूर्वी आश्वासनांचा पाऊस करीत सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारला चार वर्षे उलटूनही नागपूरातील झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देता आलेले नाहीत उलट त्यांना बेघर करण्यात भाजप-शिवसेना सरकार अग्रेसर आहे, असा घणाघाती आरोप करीत त्यांना त्वरीत मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस विनाअट त्वरीत द्यावे व मनपा हद्दीतील झोपडपट्यांना पावसाळयात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यांना केली. यावेळी मनपा कार्यालयासमोर भाजप-शिवसेना सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

नागपूर शहरातील झोपडपट्टयांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा गवगवा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात झोपडपट्टी धारकांना ५०० चौरस फुटाची जागा मिळणार तर त्यापेक्षा जास्त जागेसाठी रेडिरेकनरच्या दरानुसार रक्कम आकारली जाणार आहे. ही जागा त्यांना ३० वर्षांकरिता लीजवर देण्यात येणार असून झोपडपट्टी धारकांना याचे पुन्हा नुतनीकरण करावे लागेल. याचे लेखी हमीपत्र त्यांनी तीन महिन्यांत शासनाकडे सादर करण्याची अटही करण्यात आली. अटींची पूर्तता त्यांनी न केल्यास लीज रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे असणार. या निर्णयामुळे १२ ते १५ लाख झोपडपट्टीवासियांवर करोडो रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. भाजप सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या गोरगरीब झोपडपट्टीधारकांचे कंबरडे मोडणार आहे.

नागपूरात ४२४ च्या वर झोपडपट्टया असून १ लाख ४१ हजार ४१७ एवढया झोपडया आहेत. आठ ते नऊ लाख झोपडपट्टीधारक स्लम मध्ये राहतात हे आकडे २०१० पूर्वीचे आहेत. २००० पर्यंतच्या सर्व झोपडपट्टयांना टॅक्स लावणे व त्यांना नियमित करणे हा राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार फोटो पासेस व मालकी हक्काचे पट्टे देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा अधिनियम १९७१ नुसार झोपडपट्टीधारकानां फोटो पासेस देण्यात यावे असा कायदा आहे, असे असताना सुध्दा फोटो पासेस देण्यात आलेले नाहीत.

फक्त २९३ झोपडपट्टयांना फोटो पासेस देण्यात आले असून १३१ झोपडपट्टयांवर भाजप सरकारने अन्याय केला आहे. त्यामुळे आठ लाख लोकांचे जीवन अंधःकारमय होण्याची शक्यता आहे. १३१ झोपडपट्टयांना स्लम मध्ये समाविष्ट न करण्यात आल्यामुळे त्यांना बेघर करण्याचा विचार मनपा कधीही करू शकते म्हणून १९९५ पूर्वीच्या ४२६ झोपडपट्टया व २००० पर्यंतच्या सर्वच झोपडपट्टयांना स्लम मध्ये समावेश करावा व त्यांचे राज्य शासनाकडून स्लम नोटिफिकेशन काढण्यात याव्यात तसेच सर्व झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

यावेळी अविनाश तिरपुडे, गोपी आंभोरे, सर्वजित चहांदे, विजय गजभिये, अजय मेश्राम, अजय टाक, शाहिद शेख, विनोद चहांदे, कुमार रामटेके, बाबुराव पांचाळ, राहूल साठे, मेवालाल सरोज, गजानन उबाळे, दौलतराव मुळे, विलास चहांदे, मालती वाघधरे, अशोक झोडापे, घनश्याम तराळे, प्रकाश टेवरे, किशोर बागरी, मन्नु विराह, मोहनलाल सरोज, सुनिल राउत, विजू सिरीया, विशाल चहांदे, सुंदरसिंग ठाकून, सचिन गायकवाड, किशोर देउळकर, शुभम फुलझेले, विशाल वाघधरे, विनोद गौर, सेवक गौर, नरेंद्र हाडके, अंजली सिरीया, यशोदा पांचाळ, ममता चहांदे, दिपमाला रंगारी, गगुबाई मुळे, कल्पना रामटेके, ताराबाई गौर, प्रतिमा गायकवाड, कांचन चहांदे, लक्ष्मी सरोज, राना वाघधरे, पुष्पा साठे, सिमा चहांदे, भोजवंती उके, अविनाश रंगारी, बबलू झोडापे, लता बागरी, शारदा रामटेके, ज्योती तराळे, सिध्दार्थ वाघधरे, पूर्णा झोडापे, सुषमा ठाकूर, सुशिल ठाकूर, शारदा सरोज सह शेकडो नागरिक उपस्थित होते